![]() |
ऋग्वेद आणि सूर्यकिरण चिकित्सा |
मंडळी, वैज्ञानिकांनी जी सूर्यकिरण चिकित्सा पद्धती सध्या अनेक रोगांपासून मुक्ती मिळण्यासाठी प्रचलीत केलेली आहे, ह्याच सूर्यकिरण पद्धतींचे ज्ञान किंवा शोध, अभ्यास हा आपल्या ऋषींनी वेदांच्या माध्यमातून किती तरी हजारो वर्षांपूर्वी करून ठेवलेला आहे.
ऋग्वेद संहिता प्रथम अध्याय 50 व्या सुक्तात 11 आणि 12 व्या शोल्क मध्ये ह्याचा संदर्भ मिळतो.
सकाळची कोवळी सूर्यकिरण आणि आरोग्य प्राप्ती
मुळात सूर्यकिरण ही दिसायला जरी सफेद असतील तरी त्या मध्ये सात रंग असतात.जे मानवी शरीरासाठी लाभदायक सिद्ध झालेले आहेत.
जर्मनीचे प्रख्यात चिकित्सक वैज्ञानिक डॉ.लुईकुनी म्हणतात सकाळची सूर्यकिरणे हि अनेक रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी लाभदायक आहेत.त्यांनी अनेक रोग बरे करण्यासाठी सूर्यकिरणचा उपयोग यशस्वी केलेला आहे.
सूर्यकिरण चिकित्सा वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार सकाळची सूर्यकिरण हि भूक न लागणे, त्वचा विकार, मानसिक असंतुलन ह्यासाठी लाभदायक ठरतात.तसेच मानवी शरीरातील विटामिन "डी" ची असलेली कमतरता भरून काढण्यासाठी सुद्धा सकाळची कोवळी सूर्यकिरणे उपयोगी पडतात.
आतापर्यंत अनेक वैज्ञानिक संशोधन हि हिंदू धर्म ग्रंथ वेदांच्या आधारावर करण्यात आलेली आहेत. अर्थात हजारों वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी ह्याचा अभ्यास केलेला होता.
स्वतःला जे तथाकथित विज्ञानवादी म्हणवून घेऊन हिंदू धर्मावर टीका करणाऱ्याना माझं जाहीर आव्हान आहे , कि मी तुम्हाला अश्या प्रकारचे 100 वैद्यनानिक संदर्भ हिंदू वैदिक धर्म ग्रंथ वेदांमधून संदर्भ सहित सिद्ध करून दाखवतो आणि तुम्ही तुमच्या धर्मग्रंथ मधून मला एक तरी वैद्यनानिक संदर्भ पुराव्यासाहित सिद्ध करून दाखवा.
#वेदआणिविद्यान
credit : ASHISH JOSHI