बुद्ध पूर्णिमा


बुध्द हे चालुक्यवंशी साळुंखे कुळातील क्षत्रियकुलीन  होते .. जे क्षत्रियांच्या कुळात महत्वाचे आहे...
बुध्दांनी नवा सामूदायीक धर्म कोणताही स्थापन केला नाही तर सर्व जगाची समाजाची वेगवेगळ्या दर्शनाची पारख करुन ..त्यांनी  विचार मांडले... जे न्यायसंगत आहे .. हे पाळाण्याची प्रक्रीया व्यक्तीगत आचरणावर अवलंबुन होती... त्यांच्या संघात असणारे पण सर्व बुध्दच झाले असे पण नव्हते कारण बुध्दत्वा पर्यंत पोहचने सर्वाच्या कुवती मधे नव्हते.. यासाठी मनावर तसेच ईच्छा आकांशा आणी मोहावर ताबा असने आवश्यक असे...

त्यांनी ईश्वर पण नाकारला नाही पण परलौकीक शक्तीपुढे नमन पण केले नाही सांगायचे म्हणजे या गोष्टीचा त्यांनी विचार न करता मुळ मणुष्य धर्मावर जास्त जोर दीला.. त्यांनी या भौतिक जगात कसे जगावे ऐवढेच सांगीतले... हे करण्यासाठी त्यांनी अनुयायांचे संघ बनवले आणी विचारांचा प्रसार करने चालु केले ... त्यांच्या शिकवणुकीत आर्य अष्टांग मार्गाचे पालन करणे आणी पंचशिले पाळने हे महत्वपुर्ण होते .. हे पायरी पायरीने पाळत जाऊन मणुष्य बूध्दत्व मिळवतो असे त्यांनी सांगीतले आज जसे धर्माचे प्रारुप आहे तसा त्यांचा धम्म नव्हता जन्मतहा कुणीही बुध्द बनत नसे ..  मणुष्य बुध्द तेव्हाच बनतो जेव्हा या मार्गावर चालुन तसे वागतो असे ते म्हणत..

 ते आपले पुर्वज होते हे निसंशय आहे ..  सामुदायीक लेबल धारी धर्माची स्थापना खुप नंतर झाली जसे आज आहे बुध्द,जैन हे सर्व पुर्वी फक्त मत दर्शने होती ..त्यांच्या अनुयायांनी त्याला सामुदायीक धर्माचे रुप खुप नंतर दीले ..त्याकारणाने ते या संस्कृतीतुन वेगळे होऊ शकत नाही...

आजही हिंदु मधे हजारो मतप्रवाह आहेत .. तसा बूध्दविचार आहे ... राजकारण आणी जातीवादा मुळे हे आपले नाही असा प्रचार करणे चुकीचे आहे... उलट हे आपलेच आहे आणी हे खरे पण आहे...

आपण आज जर अवतारवाद मानतो ... त्यात पण बुध्दांना अवतार म्हणुन मान दीलेला आहे...श्रमन परंपरा पुर्वापार आहे ... सिंधुकाळापासुन तिचे बिजे रोवल्या गेली आहेत...बुध्दांने कोणतेही नवे विचार मांडले नाहीत.. त्यांनी मत दर्शनांचा पुजापध्दतीचा समाजजिवनाचा अभ्यास करुन ऐक मत बनवले म्हणजे जे त्यांना योग्य वाटले ते त्यांनी स्विकारले आणी जे चुकीचे वाटले ते नाकारले असे म्हणु शकतो...

 त्यांचे विचार सांख्यदर्शन  यावर जास्त आधारीत वाटतात.. सांख्यदर्शनाला गीतेत स्थान आहे ..सांख्ययोग नावाचा ऐक अध्यायच आहे ..कपिलमुनी ने हे मांडले आहे... हे दर्शन ईश्वराची सत्ता नाकारते ...पण ईश्वर नाही असे म्हणत नाही ... तर कर्मावर भर देते ... कर्मच मणुष्याचे तारण करु शकते हेच खरे आहे... कर्म हाच धर्म आहे ...

टीप—(मी बुध्दांनी सांगीतलेला संपुर्णपणे अहींसावाद हे मानत नाही कारण माझा हा विश्वास आहे की अहींसेच्या प्रस्थापनेसाठी कधी कधी हींसा करावीच लागते पण बुध्दांचे विचार मणुष्यधर्मासाठी चुकीचे नाही ..कुणी ईश्वरावर श्रध्दा ठेऊन पण हे पाळु शकतो )

नमो बुध्दाय

— मोहन ठाकरे देशमुख

Post a Comment

Comment here what you think about this

أحدث أقدم