मातंग समाजाचे धर्मांतरण आणि बहुजन राजकारण ...

समाज अस्तित्वासाठी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हिंदू द्वेषी धर्मांतर दलालांनो...
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
हिंदू मातंग समाजाचे राजकारणा साठी धर्मांतरन करून त्यांना ना घर का ना घाट का करून ठेवलय   बहुजनांच्या नावाखाली ऐकाचच पोट भरल जातय. आजवर मातंग समाजाचे धर्मांतरन करून काय फायदा झाला हे त्याला उशिरा का होईना समजत चाललय. आजवर मनुवादी दाखला देवुन मातंगाचा ईतिहास लपवुन ठेवुन मातंगावर सत्ता उपभोगली. राजकारण करून राजकिय, आर्थिक, शैक्षणिक द्रुष्ट्या मातंग समाज किती प्रगत केलाय हे समजायला मातंग समाज दुधखुळा राहिला नाही. तुमच्या विरूद्ध बोलणारया मातंग लढवय्याला गप्प कसे करता हे मी पाहतोय आणि भोगतोय.

मुलनिवासी म्हणता पण मुळचा मातंगाचा निवासच तुम्ही लुबाडुन घेतलाय. काही मातंगाच्या समित्यांवर संघटेवरकबजा केलाय.  दलित म्हणून मोठे राजकिय नेते झालात पण मातंगाला उपेक्षितच ठेवले. तुमच्या ज्या काही रंगड्या चालु आहे ना त्या तुमच्या वैयक्तीक ताकदिमुळे नाहीतर समस्त दलीतांच्या जिवावर चालल्या आहेत हे लक्षात ठेवा.

मातंगावर हल्ले झाले तेव्हा तुमचा दलित मातंगावरचा पुळका का दिसुन नाही आला. का पुळका फक्त राजकारणासाठीच येतोय. सरली  वेळ हातात धर केळ. गाजर आणि केळच दाखवली.  मातंगाचे भाग्यच खराब "काही" मातंगाचे पुढारी आजवरही मुखगीळुन याचे त्याचे पाय चाटत बसले आहेत. ताटाखालचे मांजर झाले आहेत.

मी माझ्या काही पोस्ट मध्ये लिहले होते कि मातंग समाज अस्पृश्य होता की नाही. का त्या समाजाचा ईतिहास लपवुन ठेवला गेला. थोडाफार पुरातण इतिहास मांडला. मातंग समाज हिंदू तसेच जैन समाजामध्ये प्रमुख अस्तित्वात दिसुन येतोय. तो पुरातन आहे. थोर आहे. वीर आहे. यावर बहुतेक मातंग समाज विचार करायला लागला तसेच ईतिहास सांगु लागला. मातंग समाजाचा इतिहास शोधुन इतिहास घडवावा हिच या विचारां माघचा हेतु होता. परंतू

धर्मांतर दलालांच्या मणात मातंगाचा इतिहास ग्रहण होणार नाही. त्यांच्या पायाखालची वाळु सरकली कि असे दिसुन येतय.  मातंग इतिहास घेवुन भविष्य घडविण्यासाठी ऐकत्र आला तर दलालांची रोजी रोटी बंद होईल. ह्या भितीने मला धमक्या धिल्या जातात. 

प.पु.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर , सा लो. आण्णा भाऊ साठे यांच्या नावावर काहिंनी आपली दुकाने थाटली. परंतु त्यांच्या नावाखाली काही संघटणा धर्मांतरणाचे राजकारण करताना दिसत आहेत. मातंगाने धर्मांतर करा किंवा करू नका हा भाग वेगळा परंतु का करावा हा विचार येवुन ठेपलाय आज रोजी. दलालांच्या काही बोलण्यावरून असा कधी कधी मणात असा विचार येतो की डाॅ. बाबासाहेबांना जर वंदनायचे असेन तर पहीला धर्म बदलावा की काय. प.पु. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्या अगोदर ह्या धर्मांतर दलालांची नितिचीच शंका येते.

दलाल म्हणतात ...
गणपती खोटे, महादेव खोटे , खंडोबा भैरोबा , मांगीरबाबा हे सगळे खोटे मुळातच हिंदू खोटा. ब्राह्मणांनी अन्याय अत्याचार केला. मग आजवरची मातंगाची दशा पाहता जो कावा केला , मातंग दलित असो कि धर्मांतर करो जसास तसा का..? हा जो कावा केला त्या काव्याला कोनते नाव द्यावा.

धर्मांतराची ति वेळ होती आता हि वेळ आहे का...?

मातंग शैक्षणिक आर्थिक द्रुष्टीने हळुहळू का होईना प्रबळ होत चालला आहे. आणि संघटितही होवु लागला आहे. मग मातंगाला संघटित होण्याची गरज आहे कि धर्म बदलण्याची. काय गरज आहे ईकडडुन तिकडे उड्या मारण्याची. त्यांना स्वताचे अस्तित्व आहे आणि ते मिळवुद्या. दलित मातंगाचे स्वताला नेते म्हणुन जर तुम्ही मिरवत असाल तर किती प्रयत्न केला मातंगाला आरक्षण मिळवुन द्यायचे.

आम्हाला सांगता देवपुजा करू नका काही मात्र चाखुन वाकुन करता. आम्हाला काही लोक सांगताहेत  बाबासाहेब आत्मसात करा तुम्ही काहि मात्र त्यांच्या विचारांचा राजकारणा साठी वापर करा. आम्ही जय भिम गर्वाने म्हणतो परंतु काहिंना जय लहुजी म्हणायची लाज वाटते.

श्रध्दा अंधश्रद्धा ज्याला त्याला समजतेय त्यामुळे धर्मांतर दलालांनी ते सांगु नका. मातंगाचे हित घेवन जर तुम्ही आमच्या दारात येत असाल तर मातंगाचा इतिहास पण सोबत घेवून या. तसेही तुमचे मातंग हित दिसलय मातंगावर हल्ले झाले तेव्हा.

आरे मि म्हणतो लावुद्या भंडार कपाळी, उडवुद्या आभाळी गुलाल निघुद्या काठ्या आन दिंड्या. येवुद्या वारी ज्याला पटतय तो बसविन गणपती . तुम्ही आम्हाला सांगु नका कारण तुम्ही तुमच ठेवता झाकुन आन दुसरयाचं पाहता वाकुन.

हे जे लिहिण्याचा प्रयत्न करतोय आपआपसात वाद किंवा रूसवा होवा म्हणुन नव्हे तर आत्मचिंतन व्हावा म्हणुन. कारण आपन सर्व  ऐकच म्हणता पण ऐकी काही बाबतीत दिसून येत नाही. म्हणुन मि आज हा विचार मांडला आहे.

क्रुपया धर्मांतरन दलालांनी मला संपर्क करू नये कारण मी बाप बदलणार नाही तसेच तुमचा आणि माझा वेळ वाया जाईल. पोकळ धमकिंना मी घाबरत नाही कारण मातंग वीर होते आणि आहेत.

आम्हा सोबत नडण्याची कोणाची माय व्यायली...
जरा चाळुनी पहा पाने आमच्या इतिहासाची. "

स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या पुर्वंजांनी ऐकत्रच इतिहास घडवलाय हे लक्षात येवुद्या.

शेवटी ऐकच सांगेन भारतभुमीला राष्ट्रभक्तांची गरज आहे कोण्या जातिची नव्हे. पाकिस्तान चिन ने आक्रमण केल्यावर नेभळट विचारांची फौज कामा येणार नाही तर शिव, लहु, आंबेडकरी विचांरांची फौज कामा येईल .

जय शिवराय
जय लहुजी
जय भीम
- Lalit Kuchekar

मातंग समाजाचा इतिहास जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.  

Post a Comment

Comment here what you think about this

Previous Post Next Post