पाकिस्तानातील सिंध प्रांतात मोहिन्द्जोडो या ठिकाणी १९२२ साली R. D. बनर्जी या ASI (Archaeological Survey of India) अधिकाऱ्याला प्राचीन शहराचे अवशेष मिळाले. त्यानंतर, त्यांना हडप्पा मध्ये असेच काही अवशेष मिळाले होते. पुढे १९३० मध्ये याठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले होते. त्यासाठी, John Marshall, K. N. Dikshit, Ernest Mackay आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठीकाणांवर संशोधन कार्य सुरु होते. या संपूर्ण खोदकामात त्यांना प्रचंड प्रमाणात माहिती मिळाली. या साईट्सवर शेवटचे खोदकाम इस १९६४ मध्ये Dr. G. F. Dales यांनी केले होते. त्यानंतर, सध्याचा वातावरणाचा परिणाम या प्राचीन अवशेषावर होऊ नये म्हणून या साईट्सवर खोदकाम बंद केले गेले आहे.

या मोहिन्द्जोडो येथे एक दगडी पाटी मिळाली आहे (खाली attach केलेल्या चित्रात). या पाटीवरील शिल्पात एक तरूण मुलगा दोन वृक्षांना जमिनीतून ओढून काढतोय अस शिल्प त्यावर कोरले आहे. हे शिल्प श्रीमदभागवतपुराणातील यमलअर्जुनाच्या कथेवरून घेतले आहे अस गृहीतक मांडता येते. या साईटवर प्रत्यक्ष खोदकाम करणारे Dr. E.J.H. Mackay यांनीही ते मान्य केले आहे. तसा त्यांनी स्वतच्या रिपोर्ट मध्ये देखील उल्लेख केला आहे. पुरातत्वक्षेत्रातील आणखी एक तज्ञ, प्रा. V. S. Agrawal यांनी सुद्धा सदर शिल्प श्रीमदभागवत पुराणातील यमलअर्जुन कथेविषयीच भाष्य करीत असल्याचे मान्य केले आहे.

यमलअर्जुन कथा (श्रीमदभागवत पुराण १०.१ ते १०.४३)
एके दिवशी दोन कुबेरपुत्र आणि शिवभक्त नलकुवर आणि मनिग्रीव्ह जलविहार करत होते. त्यांनी वारुणी नावाचे अपेयपान केलेले होते. त्यांच्या सोबत काही गंधर्व तरुणी देखील होत्या. त्याचवेळी, तिकडून नारदमुनी भ्रमण करत होते. नारदमुनीना बघून गंधर्व तरुणी शापाच्या भीतीने लपून बसल्या. पण,  या दोन कुबेरपुत्रांनी आपल्या मस्तीतच नारदमुनीकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या निर्लज्ज्तेचे, नग्नतेचे प्रदर्शन सुरुच ठेवले. यावर नारदमुनींनी त्यांना शाप दिला कि ते युगानयुगे वृक्ष बनून राहतील. झाड ज्याप्रमाणे नग्न असते पण त्यात चेतना नसते अशा रीतीने दोन्ही कुबेरपुत्र अचेतन वृक्ष झाले. नंतर, नारदाला दया आली आणि त्यांनी त्या कुबेरपुत्रांना उ:शाप दिला. त्यांनी सांगितले कि देवांच्या १०० वर्षानंतर, खुद्द विष्णू वासुदेव कृष्णाच्या रुपात येऊन तुमची मुक्तता करतील आणि तुम्हाला भगवान वासुदेवाना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभेल. ते दोन्ही कुबेरपुत्र अर्जुन या वनस्पतीचे वृक्ष होऊन गेले. आयुर्वेदात अर्जुन या झाडाचे साल हृद्यरोगात वापरले जाते.

हे दोन्हीही अर्जुन वृक्ष यशोदा मातेच्या अंगणात उभी होती. कृष्णाच्या खोड्यांना वैतागून यशोदा मातेने कृष्णाला लाकडी उखळला बांधून ठेवले. कृष्णाने ते उखळ ओढत ओढत अंगणात नेले. पण, ते उखळ या दोघा वृक्षात अडकले. कृष्णाने जोर लावला आणि त्याचवेळी खूप मोठा आवाज येऊन दोन्ही वृक्ष जमीनदोस्त झाले आणि दोन्ही कुबेरपुत्र मुक्त झाले.

हि कथा नुसत्या हिंदू वैदिक संस्कृतीतच प्रसिद्ध नव्हती. तर, ती विविध संस्कृतीना माहित होती. त्याचे चित्र देखील खाली दिलेले आहे.
मोहिन्द्जोडो, हडप्पा असोत कि जगात कुठलीही संस्कृती, सगळीकडे कृष्ण हा देव होता याचे पुरावे आहेत. त्यामुळे, मोहिन्द्जोडो, हडप्पा आणि त्याजवळील कुठलेही शहर हे वैदिक हिंदू होते यात शंकाच नाही.

शेवटी, कृष्ण चराचरात व्यापून आहे.

जय श्रीकृष्ण!!!!!!!!!!!!!

जयतु भारतम || वंदे मातरम ||
नंदलाल गवळी

संदर्भ :
१. https://www.harappa.com/
२. https://prabhupadabooks.com/sb/10/1/16






Post a Comment

Comment here what you think about this

Previous Post Next Post