सती परंपरा / प्रथा

खरे पाहता; भारतीय संस्कृतीत "सती" ही संकल्पना मुळात पूर्णतः ऐच्छिक होती.. जोर जबरदस्तीची प्रथा मुळीच नव्हती.. कालौघात ती विकृती बळावली. त्याचा निषेधच आहे.

जबरदस्ती केल्याचे जे काही पुरावे आहेत ते अर्वाचीन व मागील ६-७ शतकातलेच जास्त सापडतात. जसे की - 1) मनूची ने व त्याच्या मित्राने एका जबरदस्ती ने सती होण्यास भाग पाडल जात असलेल्या स्त्री ला दोघांनी त्यांच्या जवळील बंदूकीच्या सहायने सोडवले. नंतर त्या स्त्रीने त्या मित्रा बरोबर लग्न केले. तो गोव्यात आला असता ति त्याला भेटली त्यावेळी तिच्या डोळ्यात कृतन्यता होती अस स्पष्ट उल्लेख आहे. 2)राजा राम मोहन राय यांनी मुळात जी सती प्रथा बंद करण्यास सुरवात केली तीच मुळात जबरदस्ती ने ओरड़त सती साठी खेचत नेत असलेल्या स्त्री ला बघून..

I accept these incidental facts.

किंतु; ह्या सर्व कालौघात बळावलेल्या विकृती आहेत समाजातील. पण मी बोलतोय ते मूळ संकल्पने विषयी.. the basic of thy concept..

पुन्हा ह्या विकृतींचा जर आपण नीट अभ्यास केला, त्यामागे यथोचित कारणमीमांसा केली; तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात.

भारतातील काही प्रांतात ह्या प्रथेला जबरदस्तीचे स्वरूप दिले गेले; किंतु संपूर्ण भारतात नव्हे. दक्षिण भारतात तर ह्याचे प्रमाणच नगण्य सापडते.

ज्या प्रांतांमध्ये ह्या प्रथांना जबरदस्तीचे स्वरूप आलेले, ते प्रांत शेकडो वर्षे नृशंस परकीय आक्रमणांना व अत्याचारांना आणि शासकांना बळी पडलेले होते. त्या प्रांतातील जनांना  अत्याचाराला, अनाचाराला तोंड द्यावे लागलेले होते. त्यातल्या त्यात ह्या प्रांतांमध्ये स्त्री ही मानाचे प्रतीक म्हणूनच पाहिली जात होती. अशा वेळी डोळ्यादेखत होणाऱ्या स्त्रीयांवरील अत्याचारातून त्यास प्रतिक्रियास्वरूप म्हणून तेथील समाजाच्या मनात ह्या विकृतींनी घर केले..

आपल्या महाराष्ट्रातील; व खास करून पुणे प्रांतातील, त्यातल्या त्यात ब्राह्मण समाजातील विधवांच्या केशवपनाची बळावलेली प्रथा पण ह्याचेच द्योतक होती..

तरुण स्त्रीचा पती गेल्यावर तीला विद्रुप करण्याची विकृती.. जेणेकरून समाजातील भक्षकांच्या नजरेतून ती सुटावी..

मूळ शोधायला गेल्यास केशवपन प्रथेची सुरुवात कधीं झालेली सापडते?

अशीच उदाहरणे आहेत उत्तर भारतातील काही प्रांतात सापडणारी पडदा पद्धत, स्त्री-भ्रूण हत्या आदी आदी.. ही उदाहरणे देखील नृशंस परकीय आक्रमक व काही शासकांच्या अत्याचार, अनाचाराने हतप्रभ समाजाच्या प्रतिक्रिया स्वरूप बळावलेल्या विकृतींचे द्योतक आहेत.

खरे पाहता; पुरुषांच्या असंयमी वृत्तीचा परतावा स्त्रीला भोगावा लागलाय.. ह्या प्रथांच्या रुपात.. पुरुष स्वतःवर संयम ठेवू शकत नाही.. स्वतःच्या वृत्तीपुढे हतबल होतात.. तेव्हा त्यास लपवून त्याच्या परिणामांपासून बचाव म्हणून असले उपाय काढतात.. त्याच समाजात प्रथांच रूप घेऊन बसतात.

बाकी ह्या संकल्पनांचे मूळ शोधाल; तर त्यात ह्या विकृतीना मुळीच जागा सापडणार नाही..

सती ही मुळात प्रथा नव्हतीच.. तर जे युगुल मनोभावे एकमेकांशी इतके मिसळलेले होते की एक दुसर्याशिवाय जगायची इच्छाच करू शकत नव्हता; जसे की कबुतराचा जोडा, तेथे स्वेच्छेने सहगमनाचा निर्णय घेतलेल्या जोडीदाराच्या भावनेला आदर "सती" ह्या संकल्पनेतून दिला गेला. बाकी ह्या संकल्पनांचे मूळ शोधाल; तर त्यात ह्या विकृतीना मुळीच जागा सापडणार नाही.. आजही बऱ्याच प्रेम प्रकरणांमध्ये एक गेल्यास दुसऱ्याने देखील देह त्यागण्याचा निर्णय घेतल्याची उदाहरणे सापडतात.

पण तो निर्णय सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक निर्णय असायचा.. समाजाची त्यात कुठलीही भुमिका नव्हती..

इन फॅक्ट; प्राचीन भारतीय वाङमयात अशी बरीच उदाहरणे आहेत की जेथे उलट समाजातील विद्वानांनी जोडीदाराच्या ह्या निर्णयास विरोध करून त्याचे मतपरिवर्तन केलेले सापडते.. उदा. कौशल्या, कुंती, जिजाबाई..

In fact; (what my observations tell me is) Britishers used these things for their negative marketing tactics to create inferiority complex in Indians as well as to set a ground for their Indian & non-Indian agents; planted to project as a social figures in society, but the real intention was to make people away from their own culture & centuries old system of education and life-style.

पण ह्यांना बहाणा करून ब्रिटिशांनी आपले दलाल समाजात पेरून येथील मातीतील मूळ हिंदु धर्म-संस्कृतीविरोधी आपले षड्यंत्र राबवले.

त्यांची तीच - "कुप्रथा-परंपरा-ब्राह्मण तो बहाना है, सनातन हिंदु धर्म ही असली निशाना है" - ही कुटील दुष्ट निती त्यांच्या दलालांचे चेले चपाटे आजही राबवत आहेत. हिंदूंनी ह्याबाबत सावध रहावे.

जय श्रीराम.

- राजेश बसेर.

Post a Comment

Comment here what you think about this

أحدث أقدم