ब्रम्हा सरस्वती 


अनेक दिवसांपासून सोशिअल मीडिया वर चर्चेत असलेला एक विषय म्हणजे ब्रम्हा ने सरस्वती सोबत विवाह केला.

मुळात हा संदर्भ शिवपुराण , मतस्यपुराण, सरस्वती पुराण ह्या पुराणांमध्ये मिळतो.

पण मुळात बघायला गेलं तर वेगवेगळ्या पुराणात वेगवेगळ्या पद्धतीने ही कथा रंगवून सांगितलेली आहे. जी गोष्ट सत्य असते त्या गोष्टींचा संदर्भ सगळ्या साहित्यात सारखाच मिळतो हि गोष्ट मुळात लक्षात घेतली पाहिजे.

पुराणांमध्ये अश्या अनेक गोष्टी आपल्या सोयीनुसार भर घालण्यात आलेल्या आहेत. आणि आज त्याचाच पश्चाताप आपल्या सगळ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे ब्रम्हा ने आपली कन्या सरस्वती सोबत लग्न केलं ह्या विधानात काहीच तथ्य नाहीये ते संपूर्ण खोट आहे.

ज्यांनी सृष्टी ची निर्मती केली त्यांनीच जर नियम तोडले असते तर आज हिंदू सनातन धर्माची एवढी प्रगती झाली असती का? मुळात ह्या पुराण कथा साधारण पणे 2000 वर्षांपूर्वी लिहल्या गेलेल्या असतील.

पण एक गोष्ट मात्र इथे असलेल्या सर्व हिंदू बांधवानी लक्षात घ्यायला हवी, " ज्या ग्रंथामध्ये इतिहास असेल, ज्या ग्रंथामध्ये कथा असतील ते ग्रंथ कधीही धर्मग्रंथ होऊ शकत नाहीत त्यांना इतिहास ग्रंथ म्हंटले जाते"

पुराण, रामायण, महाभारत हे सगळे धर्मग्रंथ नसून ते इतिहास ग्रंथ आहेत.

आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ वेद आहे त्यामुळे हिंदू वैदिक धर्म म्हंटले जाते. हिंदू पुराणिक धर्म नाही म्हंटल जात.

credit : Ashish Joshi 

Post a Comment

Comment here what you think about this

أحدث أقدم