शनी ची साडेसाती

*शनी ग्रहाबद्दल वाचनात आलेला एक उत्तम लेख. जरूरवाचा अभिप्राय कळवा...*

 *शनी*
*साडेसाती ही आपल्या मागील चुकांची जाणीव करून देण्यासाठी येते, जेणेकरून आपण त्याच किंवा त्या प्रकारच्या चुका पुन्हा करू नयेत. त्याचबरोबर आपल्या जीवनाला एक चांगली दिशा ही देते. नेहमी लक्षात ठेवावे की, आपल्या सम्पूर्ण जीवनावर शनी महाराजांचे लक्ष असते*
.
*शनी ना ही कुछ भुलते है,*
*और ना ही क्षमा करते है*
.
*वो तो कर्मफलदाता तथा दंडनायक है, सिर्फ सच्चा न्याय करते है।*

*शनीची साडेसाती... धसका ? कि दिलासा ?*

*आपल्या संपूर्ण आयुष्यात कुणाला घाबरत असेल तर “शनी महाराजांना”. शनीची साडेसाती आली आता माझे काही खरे नाही... अश्या प्रकारची विधाने आपण ऐकत असतो. पण खरच त्यात घाबरण्यासारखे काही आहे का ? चला आज ह्या समज गैरसमजापलीकडे असलेल्या ह्या ग्रहाची खरी ओळख करून घेवूया आणि त्यांच्यापुढे नतमस्तकही होवूया . शनी म्हणजे त्रास , वेदना , मानसिक यातना ,क्लेश याची जणू शृंखलाच अशीच आपली समजूत आहे. अमुक एका माणसाचे साडेसातीत हे हे असे झाले म्हणजे माझेही तसेच होणार हा समज सगळ्यात आधी डोक्यातून काढून टाका.*

*प्रत्येकाच आयुष्य वेगळ आहे आणि प्रत्येकाच्या पत्रिकेतील शनीची स्थितीही वेगळीच असणार आहे. शनीचा धसका घेण्याऐवजी जर त्याला निट समजून घेतलत तर त्याबद्दल असणारे गैरसमज तर दूर होतीलच उलट तुमची साडेसाती सुखकर होण्यास मदतच होईल. मला सांगा आयुष्यात काय फक्त साडेसातीच्या काळातच वाईट घटना घडतात का ? नाही इतरही वेळी घडतात. खर तर साडेसाती हि मानूच नका. शनी हा तुमचा शत्रू नाही तर तो तुमचा मित्र आहे. शनी ज्याला कळला त्याला सगळेच सोपे होवून जाईल. अहो आपला एक संपूर्ण दिवस सुद्धा चांगल्या वाईट घटनांनी भरलेला असतो मग संपूर्ण साडेसात वर्ष वाईटच जातील हे असे का समजायचे , विचार करा.*

*शनीची साडेसाती हि साडेसात वर्षाची असते हे आपण सर्वांनाच माहित आहे. एखाद्याची रास “सिंह “ असेल तर शनी कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा ह्या सिंह राशीला साडेसाती सुरु झाली असे समजावे आणि जेव्हा शनी तुला राशीत प्रवेश करेल तेव्हा सिंह राशीची साडेसाती संपली असे समजायचे . याचाच अर्थ कर्केत २|| वर्षे ,सिंहेत २|| वर्षे आणि कन्येत २|| वर्षे असा साडेसात वर्षाचा काळ म्हणजे सिंहराशीची साडेसाती . आपली जी कुठली रास असेल त्या राशीच्या आधीच्या राशीच शनी आला कि आपल्याला साडेसाती सुरु आणि आपल्या पुढील राशीतून शनी जेव्हा पुढे जाईल तेव्हा आपली साडेसाती संपली अस समजायचे. सध्या  वृश्चिक ,धनु आणि मकर राशिना साडेसाती चालू आहे.*

*शनी हा वैराग्याचा , उदासीनतेचा कारक आहे. आळशी, अप्रामाणिक लोक शनीला अजिबात नाही आवडत. कष्ट करणारा समाज शनीला आवडतो. असेल हरी तर देयील खाटल्यावरी म्हणणार्यांना शनी झोडपून काढेल. शनीला सर्वात न आवडणारा गुण म्हणजे अहंकार , मिजास ज्या माणसाना अतिशय मिजास आहे तसेच जी माणसे अत्यंत माजोरीपणाने, अहंकाराने मी म्हणजे कोण ? अश्या थाटात वागत असतात त्यांना शनीची साडेसाती कशी गेली विचारा.*

*साडेसातीत माणसाची सगळी मिजास उतरते, मी असा आणि मी तसा म्हणणाऱ्यांची शनी झोप उडवतो. शनी साडेसातीत मनुष्याला सगळ्या मोहापासून दूर करतो, अंतर्मुख होण्यास शिकवतो. साडेसाती मध्ये लग्न होणे, घर होणे , परदेशगमन , चांगली नोकरी , प्रमोशन मिळणे अश्या चांगल्या घटनाही घडतात. साडेसाती दर ३० वर्षांनी येते कारण एका राशीत शनी २|| वर्षे वास्तव्य करतो  त्यामुळे पूर्ण आयुष्यात साडेसाती कमीतकमी २ वेळा तरी येते असे म्हणायला हरकत नाही. चांगल्या घटनांचे श्रेय शनी महाराजांना न देता फक्त विपरीत घटनांचे खापर मात्र शनी महाराजांवर फोडणे हा मनुष्य स्वभावाच आहे. परंतु हि पळवाट योग्य नाही. साडेसातीत आपली वाईट कर्मे एकामागून एक आपल्या समोर हात जोडून उभी राहतात आणि त्याबद्दल शासन ठोठावण्याचे काम शनी महाराज निरपेक्षपणे करत असतात इतकच. तुमच्या चांगल्या कार्माचही फळ ते नक्कीच देतात.*

*इतर कुठल्याही देवाची पूजा करत नसलात तरी शनी महाराजांचे नित्य स्मरण तुमचे जीवन आनंदी करेल यात शंकाच नाही.*

*साडेसातीत खोटे आरोप येणे, तुरुंगवास, अप्तेष्टांबरोबर कलह , कुटुंबात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होणे, घरातील इस्टेट जमिनी वरून वाद , व्यवसायाची हानी होणे , अपकीर्ती , दीर्घ आजारपण, आपत्ती, धननाश होणे, अपमानास्पद घटना घडणे , मनस्ताप , आपल्याबद्दल समाजात गैरसमज पसरणे यासारख्या गोष्टी घडून येतात.*

*कुटुंबात एकाच वेळी एकापेक्षा जास्ती व्यक्तींना साडेसाती येणे हे चांगले नाही. ज्यांच्या पत्रिकेत चंद्र ६/८/१२ या स्थानात असतो त्यांना तसेच ज्यांना शनी किंवा राहूची महादशा, अंतरदशा चालू आहे अश्या लोकांना साडेसाती संघर्षमय जावू शकेल. चंद्र-शनी युती हि पत्रिकेत चांगली नाहीच.*

*साडेसातीत काय करावे ?*

*सगळ्यात उत्तम उपाय हा कि गप्प बसावे. आवश्यक तेव्हडे आणि कमीतकमी बोलावे, कुणाची निंदा नालस्ती करू नये. कुणाही बद्दल वाईट बोलू नये. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता आळस झटकून कामाला लागावे. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा ,शनी हा वृद्ध ग्रह आहे त्यामुळे वृद्ध माणसांची सेवा करावी. कुणालाही गृहीत धरू नये , कुणाला जामीन राहू नये, सगळ्यात महत्वाचे म्हणजे अहंकारास तिलांजली द्यावी , असत्य भाषण करू नये. कुणाकडूनही पैसे उधार घेवू नयेत .आपण मेहनत करावी आणि त्याचे शनी महाराज योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत हे पक्के ध्यानात ठेवावे.*

*बुधवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जावून दर्शन घ्यावे. शनी किंवा मारुती मंदिरातून घरी यावे आणि मग पुन्हा पुढील कामास जावे. मंदिरात दर्शन घेवून तसेच पुढे बाजारात किंवा तसेच पुढे  सिनेमाला जावू नये. जमल्यास या काळात शनिशिंगणापूर इथे जावून शनी महाराजांचे दर्शन घेवून तैलाभिषेक करावा. एक लक्ष्यात ठेवा आपण करत असलेली कुठलीही साधना किंवा उपाय याचा उहापोह किंवा त्याची कुठेही चर्चा करू नये. कारण त्याचे फळ कमी होते, मी १००००  जप केला हे सांगणे म्हणजेही एक प्रकारचा अहंकाराच आहे. हनुमान वडवानल स्तोत्र तसेच शनिवारी शनीमहात्म् हा पवित्र ग्रंथ वाचवा. वाचण्यापूर्वी त्याची पूजा करावी. साडेसातीचा फारच त्रास होत असेल तर एका मातीच्या भांड्यात गोडेतेल घ्यावे व त्यात आपला चेहरा निट न्याहाळावा व ते तेल मारुतीच्या मंदिरातील समई मध्ये नेवून ओतावे. लक्ष्यात असुदे कि हे तेल जळले पाहिजे  हे तेल चुकूनही मारुतीच्या मूर्तीवर वाहवयाचे नाही आहे. हा उपाय घरातील पुरुषांनी करावा. असे ३ शनिवार करावे म्हणजे आपल्याला जर कुणाची पीडा असेल तर ती जाईल . सर्वात महत्वाचे म्हणजे माजोरीपणा , अहंकार जर सोडला तर ५० % काम फत्ते तिथेच झाले असे समजावे कारण शनीला अहंकाराचा तिटकारा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शानि महाराजांवर नितांत श्रद्धा ठेवा.*

*शनी आपल्या आयुष्याचा वाटाड्या आहे हे विसरू नका.*

*नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम | छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम || हा शनीचा जपही जमेल तितका करावा...हे सर्व करताना मन शांत ठेवावे. आपले काही भोग असतात आणि ते भोगूनच संपवायचे असतात हे लक्ष्यात ठेवा. आता साडेसाती आली आता आपली  आयुष्यातील ७|| वर्ष वजा करा असा मुर्खा सारखा विचार अजिबात करू नये. शनी हा न्यायी ग्रह आहे हे आधीच सांगितले आहे.*

*आपल्या कष्टाना तो न्याय दिल्याशिवाय राहत नाही. खर सांगू का संपूर्णपणे शरणागती पत्करून नतमस्तक व्हावे यासारखा उत्तम उपाय नाही . शनी ज्याला कळला तो त्याला शत्रू नाही मित्र मानेल आणि आयुष्यभर त्याची पूजा आराधना करेल. खरच शनी हा आपला मित्र आहे साडेसातीचा घसका न घेता त्याचे आनंदाने स्वागत करा , शनी महाराजाना अनन्य भावे शरण जावून आपल्या झालेल्या चुकांचे प्रयश्चीत्त घ्या आणि मग बघा शनी महाराज तुमचे जीवन कसे आनंदाने फुलवून टाकतील. साडेसातीत मनुष्य घडतो हे लक्ष्यात ठेवा. जीवनाचा खरा अर्थ त्याला साडेसातीतच समजतो.*

*चला तर मग आज शनी बद्दलचे सगळे समाज गैरसमज दूर झाले का ? मनातील मरगळ झटकून नवीन उत्चाहाने  कामाला लागूयात.  आपणा सर्वांवर शनिदेवांची सदैव कृपादृष्टी राहो तसेच तुम्हा सर्वांचे जीवन आनंदाने उजळून निघुदेतहीच शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना.*

Post a Comment

Comment here what you think about this

Previous Post Next Post